चांदोरे – पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

चांदोरे – पाताळात दडलेला ऐतिहासिक ठेवा

रायगड जिल्हा हा ऐतिहासिक ठेव्यांनी समृद्ध असा जिल्हा आहे, मात्र आजही येथे अशी अनेक ऐतिहासिक महत्व असलेली ठिकाणे आहेत जी उजेडात यायची आहेत. रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातल्या चांदोरे या लहानशा गावात गेल्या वर्षापासून मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागाकडून इंडियन स्टडी सेंटर(इंस्टुसेन) या संस्थेच्या मदतीने सुरु असलेल्या उत्खनामुळे चांदोरे या गावाचाच नव्हे तर रायगड जिल्ह्याचाही पाताळात दडलेला वैभवशाली इतिहास जगासमोर येण्याची सुरुवात झाली आहे. मुंबई किंवा पुण्याहून साई-मोरबा मार्गे दिवेआगर्-हरिहरेश्वर्-म्हसळा किंवा श्रीवर्धन येते जाताना वाटेतच चांदोरे गावाचा थांबा दिसतो, मात्र वाहनातून निरिक्षण केल्यास या गावाचे महत्त्व लक्षात येत नाही यासाठी या गावाचा…

Read More

निसर्गरम्य व ऐतिहासिक तळे व तळागड

निसर्गरम्य व ऐतिहासिक तळे व तळागड

रायगड जिल्ह्यात पुरातन ऐतिहासिक वारसा सांगणारी अनेक गावे आहेत. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तळे हे गावं त्यापैकीच एक. हजारो वर्षांचा प्राचिन वारसा असणारे हे गाव आजही आपली ऐतिहासिक ओळख व निसर्गरम्यता शाबुत ठेवून आहे. प्राचिन काळी अरबी समुद्रामार्गे होणार्‍या दळण वळण तथा प्रवासाचा एक मार्ग तळ्यावरुन जात असे हे आपल्याला याच तालुक्यात असलेल्या कुडे-मांदाड येथील सातवाहन कालीन लेण्यांवरुन लक्षात येते. सातवाहन काळास महाराष्ट्राचे सुवर्णयुग असेही म्हटले जाते कारण सर्वत्र स्थैर्य नांदत असतानाच महान कलाकृती निर्माण करण्यास अवसर मिळतो व सातवाहन काळातच कोकण मार्गे देशावर जाणार्‍या महत्त्वांच्या मार्गांवर अनेक लेण्यांची निर्मिती झाली….

Read More

रायगड जिल्ह्यातली ‘गजांत लक्ष्मी’ शिल्पे

रायगड जिल्ह्यातली ‘गजांत लक्ष्मी’ शिल्पे

जगातील सर्वच धर्मांमध्ये प्रतिकांना महत्त्वाचे स्थान आहे. ही प्रतिके मुर्ती, चंद्र-सुर्य, प्राणी, वृक्ष इत्यादी स्वरुपात पुजली जातात. हिंदू धर्मात तर असंख्य प्रतिके आहेत व प्रत्येक प्रतिकाचे वेगवेगळे वैशिष्ट्य सुद्धा आहे. अशाच प्रतिकांपैकी एक म्हणजे ‘गजांत लक्ष्मी’ शिल्प. रायगड जिल्ह्यासहित कोकण व महाराष्ट्राच्या अनेक भागांत ही गंजात लक्ष्मी शिल्पे वेगवेगळ्या ठिकाणी पहावयास मिळतात. सर्वप्रथम गजांतलक्ष्मी ही संकल्पना काय आहे ते समजून घेऊ, फार पुर्वीपासून मानव समाजात संपत्तीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच संपत्तीसाठी अनेक युद्धे, संघर्ष झाली आजही ही परंपरा चालूच आहे मात्र परिमाणे बदलली आहेत. लक्ष्मी देवी ही संपत्ती व सुबत्ता…

Read More

नागांव – अष्टागरांचा ‘नागमणी’

नागांव – अष्टागरांचा ‘नागमणी’

रायगड जिल्ह्याचा सागरी इतिहास जर कोणी लिहावयास घेतला तर तो अष्टागरांशिवाय पुर्ण होऊ शकत नाही. प्राचीन काळी दमणगंगेपासून मुंबईपर्यंतच्या प्रदेशास शुर्पारक आणि मुंबईपासून रेवदंड्याच्या खाडीपर्यंतच्या प्रदेशास अष्टागर म्हणुन ओळखले जात असे. अष्टागर म्हणजे अष्ट आगरे अर्थात आठ मुख्य स्थानके. ही अष्टाग्रे नक्की कोणती होती याबाबत अनेक मतभेद असले तरी सर्वाधिक प्रचलीत मतानूसार अलिबाग, नागाव, थळ, सासवणे, अक्षी, किहीम, साखर व आवास ही गावे अष्टागरे म्हणुन प्रसिद्ध आहेत. ही सर्व अष्टागरे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यातच आहेत. अशा या अष्टागरातले एक प्राचिन गाव म्हणुन नागाव प्रसिद्ध आहे, सध्या नागाव हे पर्यटकांचे नंदनवन…

Read More

‘ग्रीन सर्कल’ एक अनोखे ‘विज्ञानशिल्प’

‘ग्रीन सर्कल’ एक अनोखे ‘विज्ञानशिल्प’

शैक्षणिक आणि सांस्कृतिक पंढरी असलेल्या अमरावती शहराच्या पूर्वेकडे विद्यापीठापासून मार्डी रस्ता लागतो. या रस्त्याने प्रवास करताना अवघ्या पाच-सात किलोमीटरनंतर उजवीकडे सातपुडा पर्वताच्या उपरांगा नजरेस पडतात. या पर्वतरांगेतील हिरवीगार वनश्री येणाऱ्या जाणाऱ्यांच्या मनावला सुखावून जाते. तेथील वृक्षलतांमधून भरारी मारणारे पक्षी लक्ष वेधतात. मोराचे केकारणे ऐकू येते. वृक्षराजीतून फेरटका मारला तर निलगाई, चितळ तर कधी-कधी बिबटसुध्दा नजरेत पडतो. पुढे काही अंतरावर ‘परसोडा’ गावच्या अलीकडे उजव्या बाजूला पर्वतराजीच्या निसर्गरम्य कुशीत एक वास्तूशिल्प लक्ष वेधून घेते. ‘ग्रीन सर्कल’ हे या विज्ञानशिल्पाचे नाव. या अष्टकोनी वास्तूच्या गर्भातून निघालेला षटकोनी आकारातील पन्नास डायमिटरचा प्रचंड लोखंडी ‘डोम’…

Read More